Welcome to Adarsh Institute of Technology & Research Centre, Vita.

Welcome to AITRC Vita.. B.Tech Admission Enquiry 2022-23

Artificial Intelligence (AI) हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे 21 वे शतक हे फक्त Artificial Intelligence तंत्रज्ञानाचे लक्षात ठेवले जाईल. कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात. जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून एआयने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे. आज, मशीन्स तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखतात, कार चालवितात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरेच काही चांगले काम करतात. AI तंत्रज्ञानाद्वारे कोणतीही मशीन मनुष्या सारखे स्वतः डोकं वापरून काम करू शकते. जसे की भाषा ओळखणे, विविध भाषेत बोलणे, आवाज ओळखणे, काम करणे, एकमेकांशी संवाद साधणे, इत्यादी गोष्टी करू शकते. AI चा फुल फॉर्म आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) असा आहे. एआय ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. एआय म्हणजे मानवी बुद्धिमत्ते सारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये व त्या मशीन मधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ला मराठी मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रात वापर केला जातो. जॉन मॅककार्थी (John McCarthy) यांनी 1956 साली आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शोध लावला होता. तसेच कालांतराने ह्या तंत्रज्ञानाला खूप मागणी वाढू लागली. भविष्यात ह्याच तंत्रज्ञानाचा बोलबाला असणार आहे. भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मानवी जीवनाचा एक हिस्सा बनणार आहे. छोट्यात छोट्या कामात ह्या एआय तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. तसेच आगामी काळात माहिती तंत्रज्ञाना प्रमाणेच एआय हा मानवी जीवनाचा एक भाग बनेल. मशीन लर्निग हा सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा भाग आहे. ज्यामध्ये एआय वर आधारित मशीन जुना देता एकत्रित करून त्यांच्या मदतीने संपूर्ण माहिती जाणून घेते व त्यामध्ये गरजेनुसार बदल करते.
वर्तमान मध्ये अनेक मोठ्या आणि लोकप्रिय कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून ते त्यांची कंपनी मजबूत बनवत आहेत. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिसर्च सेंटर उपलब्ध आहेत. तिथे ह्यावर नवनवीन प्रयोग होत असतात. तसेच अनेक कॉलेज सुद्धा आहेत जिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाबद्दल शिक्षण दिले जाते. आपण एआय तंत्रज्ञान कोण कोणत्या क्षेत्रात वापरले जाते ते पाहणार आहोत. AI तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात वापरले जाते. AI तंत्रज्ञानामुळे कोणतेही काम अवघ्या मिनिटात करता येते. त्यामुळे ह्याचा वापर करून अनेक क्षेत्र विकसित होत आहेत. कोण कोणत्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरले जाते त्याबद्दल खाली जाणून घेऊया.
Retail, Shopping and Fashion
Security and Surveillance
Sports Analytics and Activities
Manufacturing and Production आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे होणारे उपयोग अनेक आहेत. आपण रोज वापरणाऱ्या स्मार्टफोन्स मधील ऍप्लिकेशन हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञाना चे उदाहरण आहेत. जसे की, Google Lens, AI Camera, Google Assistant, Alexa, Chat Bots, इत्यादी. आपल्या दैनंदिन जीवनात ह्या सर्व एआय तंत्रज्ञानाचा आपण उपयोग करतो.
तसेच अनेक ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग केला जातो. आवाज ओळखण्यासाठी, चेहरा ओळखण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. तसेच मोबाईल गेम्स मध्ये सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो. जेव्हा आपण एखादा गेम खेळतो तेव्हा त्या गेम मध्ये आपल्यासोबत समोरून कॉम्प्युटर खेळतो. तर तो कॉम्प्युटर नसून त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर केलेला असतो. मोठ मोठ्या कंपन्या ग्राहकांच्या सोयीसाठी आणि चांगल्या सुविधेसाठी एआय तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहेत. कंपन्यांच्या वेबसाईट वर एक चॅट बोट असतो. त्यावर ग्राहकाने काही प्रश्न किंवा प्रोब्लेम विचारल्यास ते बोट्स त्यांना उत्तर देतात. व त्यांच्या प्रश्नाचे उत्तरही मिळते. ह्यामुळे ग्राहक खूप आनंदी आणि समाधानी होतो.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून अनेक क्षेत्र विकास करत आहेत. अनेक वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध करीत आहेत की, येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून अनेक क्षेत्र विकसित होणार आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मदतीने मशीन, कॉम्प्युटर आणि यंत्र बनवून भविष्यात महत्वाची कामे करण्यासाठी मानवाच्या बदली वापर केला जाऊ शकतो. म्हणजेच कोणतेही कठीण काम एका बुद्धिमान मशीन मार्फत केले जाऊ शकते. तसेच मशीन चा वापर 24 तास केला जाऊ शकतो. त्यामुळे जास्त उपयोग करता येऊ शकतो.
अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या मार्फत ग्राहकांना अनेक चांगल्या सेवा देऊ शकतात. त्यासोबत डेटा चोरी होणे, ऑनलाईन लिक्स, ऑनलाईन फ्रौडस इत्यादी गोष्टींवर नियत्रंण आणता येऊ शकते. डिजिटल गोष्टीमध्ये AI चा खूप फायदा होऊ शकतो. जसे की स्मार्टफोन्स, ऑनलाईन बँकिंग व्यवहार, ऑनलाईन डेटा, फाईल्स सुरक्षित राहू शकतात. कोणीही ह्यांना हॅक किंवा एक्सेस करू शकणार नाही. त्यामुळे गोपनीयता धोरण पाळले जाईल.
अधिक महिती...


Sr. No.
Course Name
Intake
Choice Code
1 Civil Engineering 30 630419110
2 Computer Science & Engineering 60 630424210
3 Elecrtical Engineering 30 0630429310
4 Electronics & Telecommunication Engineering 30 630437210
5 Mechanical Engineering 30 630461210
6 Artificial Intelligence & Machine Learning 90 630492110
7 Elecrtical & Computer Engineering 30 630492610

© 2021 AITRC. All Rights Reserved